*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम हायकू काव्यरचना*
*प्रभू श्रीराम*
सजे अयोध्या
पावन धाम झाले
श्रीराम आले……
बालकासम
हसरे गोड रूप
दिव्य स्वरूप….
स्वर्णमंदिरी
मूर्ती विराजमान
हरले भान…..
शरयू तीरी
भक्तीने आराधना
पूर्ण साधना…..
जनसागर
अमाप लोटलेला
राम पाहिला…..
घरी अंगणी
दीपावली साजरी
रामगजरी…..।।
अरुणा दुद्दलवार
अरुणिमा@✍️