आचरातील रामेश्वर मंदिरात उद्या रामनवमी उत्सव…
मालवण
आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा रामनवमी उत्सव उद्या शाही थाटात साजरा होणार आहे. अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवा निमित्त रामेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानचे सर्व मानकरी, देवसेवक, नोकर-चाकर, महालदार, विश्वस्त मंडळ हा उत्सव दिमाखात पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.या उत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, पुणे, बेंगलोर येथील श्री रामेश्वर भक्तगण आचरे येथे मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. गुढीपाडव्या पासून रामेश्वर मंदिरात भक्तांची रिघ लागली होती. गुढीपाडवा ते लळीतापर्यंत अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात रघुपती मुर्तीची पूजा, रोज दुपारी रघुपतीची आरती, सायंकाळी दरबारी प्रख्यात गायकांचा गायनाचा कार्यक्रम व रात्री उशिरा शाही लवाजम्यासह पालखी मिरवणूक सोहळा व कीर्तन होणार आहे.