महामार्ग चौपदरीकरण कामाचा कणकवलीकरांकडून पंचनामा…

महामार्ग चौपदरीकरण कामाचा कणकवलीकरांकडून पंचनामा…

’कुणी फुटपाथ देता का फुटपाथ’ या बॅनरची शहरात चर्चा…

कणकवली

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत गाव, शहरे यांचे दिशानिर्देश करणार्‍या फलकाची कमान थेट फुटपाथवरच लावण्यात आली आहे. त्यामुळे पादचार्‍यांना थेट महामार्गावरून जा-ये करावी लागणार असून यात अपघातांचीही शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर महामार्ग चौपदरीकरणाचा पंचनामा करणारा ‘कुणी फुटपाथ देता का फुटपाथ’ असा बॅनर आम्ही कणकवलीकरांनी त्या कमानीवरच लावला आहे.
शहरातील जानवलीनदीच्या दोन्ही पुलावर गाव, शहरे, पर्यटनस्थळे आदींबाबत दिशानिर्देश करणारी कमान राष्ट्रीय महामार्ग विभागाने उभारली आहे. मात्र या कमानीचे दोन्ही खांब फुटपाथवरच रोवण्यात आले आहेत. फुटपाथवरील हे खांब हटवावेत यासाठी नागरिकांनी विविध माध्यमातून आवाज उठवला. मात्र महामार्ग ठेकेदार तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग येत नसल्याने आज अखेर आम्ही कणकवलीकर संस्थेच्या सदस्यांनी एकत्र येऊन या कमानीवर ‘कुणी फुटपाथ देता का फुटपाथ’ असा फलक लावला आहे. आज या फलकाची मोठी चर्चा शहरात होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा