किशोर कदम यांची जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती
कणकवली/प्रतिनिधी
यावर्षीचे सिंधुदुर्ग जि. प. आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर कदम यांची प्राथमिक शिक्षकांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून श्री कदम यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
किशोर कदम हे जि.प.शाळा ओसरगाव नं.१ येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांना यावर्षीचा जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच त्यांचा सहकार क्षेत्रातही अभ्यास आहे. सध्या ते कास्ट्राइब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महासचिव म्हणून काम पाहत आहेत. सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. आताच मुंबईत रवींद्रनाथ नाट्य मंदिर येथे झालेल्या सुर्वे मास्तर साहित्य संमेलनामध्ये निमंत्रितांच्या कवी संमेलनामध्ये त्यांना कविता वाचण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
एक उपक्रमशील शिक्षक आणि सामाजिक चळवळीत महत्वपूर्ण योगदान असलेले श्री.कदम यांचे तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.