कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा मेळावा शनिवारी ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता कुडाळ पावशी येथील वाटवे कार्यालय येथे संपर्क मंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, उपनेते संजय आंग्रे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.
यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजू बिड्ये, मंदार लुडबे, बाबू धुरी, सुरज बिरमोळे आदी उपस्थित होते. दत्ता सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांचा स्वागत सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने केला जाणार आहे. पक्ष संघटनात्मक दृष्टीने आयोजित या मेळाव्यात प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी शिवसेना आजी-माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, सहकारातील प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन दत्ता सामंत यांनी केले आहे.
तसेच शिवसेना मुख्य नेते त्याचा राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने जी यश प्राप्त झाले त्याबाबत जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आभार मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हापमुख दत्ता सामंत यांनी दिली.