*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ स्मिता श्रीकांत रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सीताहरण….आतुरता मिलनाची*
वनवासाची चौदा वर्षे चित्रकूट,पंचवटीत
कंदमुळे,फलाहार कुटीत कठिण काळ
अभिलाषा धरता झाली विद्रूप शुर्पणखा
अपहरण होण्या सीतेचे आली दुष्ट वेळ ||१||
सीता अती सुंदर करी स्वीकार वदे बंधुस
क्रोधीत रावण करी निश्चय सीता हरणाचा
मोहित जानकी देखता रूप काचंन मृगाचे
राम देई हाक, जीव कासावीस लक्ष्मणाचा ||२||
यतीच्या रुपाने रावण मागी भिक्षा सीतेला
ओलांडिता लक्ष्मण रेखा हरण सीतेचे करी
मार्गात विरोध करिता कापले पंख जटायुचे
विलाप करुनी सीतेने टाकले दागिने वाटेवरी ||३||
लंकापुरी अशोकवनी विलाप करी सीतामाई
शोध लागता सीतेचा हनुमंत करी लंकादहन
गर्व हरण करण्या रामासह निघाली वानरसेना
स्वीकार करण्या विनवी सती मैथीलीस दशानन ||४||
अपराध न करावा विनवी मंदोदरी रावणास
सीता सांगे त्रिजटेस प्राण त्यागते अशोकवनी
दास देई मुद्रिका,दावी अंतःकरणातील रामराया
आगमनाची वार्ता ऐकुनी हर्षित होई शकुनानी ||५||
ककुत्स्थ कुळातील राघव आले लंकापुरी
पार केला सेनेसह सेतू आतुरता मिलनाची
युद्ध जिंकता राज्य दिले बंधु बिभिषणाला
पुष्पक विमान मार्गस्थ वैदेही सह अयोध्यला ||६||
सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.नागपूर