*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना जि. प. मधून योजना मंजूर*
सिंधुदुर्ग
जि. प. 5% सेस मधून सिंधुदुर्ग जिह्यातील दिव्यांग बांधवांना योजनेतील तीन चाकी स्वयंचलित गाडी (ज्युपिटर) मंजूर. २७ लाभार्थ्यांना लाभ.घरघटी ३५ लाभार्थ्यांना लाभ. १५ लाभार्थ्यांना मोबाईल,२८ लाभार्थ्यांना घरकुल योजना मंजूर झालेली आहे. ही मंजुरी मा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी साहेब व समितीच्या माध्यमातून घेण्यास आली. यामध्ये काही दिव्यांग बांधवांना काही अडचणींना सामना करावा लागला.ही बाब भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांना समजताच तातडीने भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांची भेट घेऊन जिल्हा सिंधुदुर्ग बँकचे अध्यक्ष मनोजजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून अडचणीतील दिव्यांग बांधवांना कर्जपुरवठा करून त्यांच्या समस्या सोडवील्या. नाहीतर काही दिव्यांग बांधवांना या योजनांपासून वंचित रहावे लागेल असते. असे झाल्याने दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल आम्ही भाजप दिव्यांग आघाडी सिंधुदुर्ग आणि दिव्यांग बांधवांच्या वतीने मा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब, मनीष दळवी,जिल्हा बँक अध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी,जी. प. सिंधुदुर्ग, समाजकल्याण अधिकार सिंधुदुर्ग व संबंधित अधिकारी यांचे शतशः आभार मानल आहोत.