You are currently viewing यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने यंगस्टार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने यंगस्टार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने यंगस्टार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

महिला कबड्डी स्पर्धा देखील ठरणार लक्षवेधी

विविध बक्षिसे व यंगस्टार चषकाचे आकर्षण

कणकवली

यंगस्टार मित्रमंडळ कणकवली च्या वतीने यंगस्टार चषक 2025 कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने निमंत्रित संघाची राज्यस्तरीय प्रकाश झोतातील कबड्डी स्पर्धा 18, 19, 20 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजल्यानंतर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 50 हजार 29, द्वितीय पारितोषिक 25 हजार 29 व प्रत्येकी यंगस्टार चषक, तृतीय पारितोषिक 5 हजार 29, चतुर्थ पारितोषिक 5 हजार 29, अष्टपैलू खेळाडू, 2 हजार 529, उत्कृष्ट पकड 1हजार 529, उत्कृष्ट चढाई 1हजार 529, शिस्तबद्ध संघ २ हजार ५२९ व प्रत्येकी यंग स्टार चषक, सर्व सामन्यांमध्ये सामनावीर व बोनस किंग अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच यंगस्टार चषक ची महिला कबड्डी स्पर्धा देखील 17, 18 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजल्यानंतर होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 7 हजार, द्वितीय पारितोषिक 5 हजार व प्रत्येकी यंगस्टार चषक तसेच अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई, शिस्तभंग संघला प्रत्येकी यंग स्टार चषक देण्यात येणार आहे. भालचंद्र महाराज आश्रमा शेजारी कणकवली नगरपंचायत च्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये या स्पर्धा होणार आहेत. क्रीडा रसिकांनी या दोन्ही स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन यंगस्टार मित्र मंडळ कणकवली च्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा