*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*एप्रिल फुल*
पाच वर्षाने
देतात हुल
जनता बनते
एप्रिल फुल
थापेबाजी
आश्वासने
भुलतात
सारी मने
लाडक्या योजना
पंधरा लाख
तिजोऱ्या
झाल्या खाक
निपटून सारा
भ्रष्टाचार
म्हणे आम्ही
करू कारभार
ज्यांच्या वरती
डागल्या तोफा
पक्षात येताच
विरल्या वाफा
“खतरेमे” ची
दिली हुल
जनता झाली
एप्रिल फुल.
नाविन्य इथे
उरले कुणा
एप्रिल फुल
रोजच म्हणा
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित