मालवण तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ एप्रिलला…
मालवण
ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षणाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मालवण तालुक्यासाठी ६५ ग्रामपंचायत सरपंचाची आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहित पद्धतीने निश्चित करण्यासाठी प्रवर्ग निहाय सरपंच आरक्षण सोडत ८ एप्रिल ला सकाळी ११ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे.
तरी या आरक्षण सोडत कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी प्रवर्गनिहाय सरपंच पद आरक्षण निश्चितीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.