You are currently viewing राजा शिवाजी चौक मित्र मंडळच्या वतीने सावंतवाडी शहर स्वच्छता कर्मचारी दीपक म्हापसेकर यांचा सत्कार.

राजा शिवाजी चौक मित्र मंडळच्या वतीने सावंतवाडी शहर स्वच्छता कर्मचारी दीपक म्हापसेकर यांचा सत्कार.

राजा शिवाजी चौक मित्र मंडळच्या वतीने सावंतवाडी शहर स्वच्छता कर्मचारी दीपक म्हापसेकर यांचा सत्कार.

सावंतवाडी

राजा शिवाजी मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त महापूजेचे आयोजन केले जाते शहरामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीचा दरवर्षी सत्कार केला जातो तो बहुमान सावंतवाडी नगरपरिषदेचे शहर स्वच्छता कर्मचारी दीपक म्हापसेकर यांना देण्यात आला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहर स्वच्छता अभियानावर जास्तच जास्त भर देऊन सावंतवाडी शहर स्वच्छ व सुंदर ठेवले होते याची जाणीव ठेवून साळगावकर यांच्या हस्ते त्यांचा आज सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे या मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन केले होते.त्यामध्ये सोलो डान्स व ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोलो डान्स व ग्रुप डान्सस्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला एकूण 56 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये विजेते स्पर्धकांचे निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आले.
बालगट प्रथम क्रमांक सान्वी मोरजकर, द्वितीय क्रमांक दृश्यम परब, तृतीय क्रमांक आराध्या कोठावळे.मोठा गट प्रथम क्रमांक सोहम जांभोरे,द्वितीय क्रमांक समर्थ गवंडी, तृतीय क्रमांक नंदिनी बिले, ग्रुप डान्स प्रथम क्रमांक RDX ग्रुप, द्वितीय क्रमांक जानू डान्स अकॅडमी, तृतीय क्रमांक MJ डान्स अकॅडमी (किड्स) या स्पर्धकांना रोख रक्कम स्मृतिचिन्हे व सर्टिफिकेट देण्यात आले. यासाठी स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक सौ. भक्ती ओंकार पोकळे ( जामसंडेकर) व दुसरे परीक्षक अमृत अशोक जामदार.
सदर कार्यक्रम मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व या मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर ,अरुण घाडी, सचिव दीपक सावंत सहसचिव महादेव राऊळ, तसेच या मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख रवी जाधव यांच्या सहकार्याने व मंडळाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
शहरातील सुप्रसिद्ध वकील व सामाजिक कार्यकर्ते अनिल निरवडेकर यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तसेच मराठा संघाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले मंडळाला शुभेच्छा दिल्या. तसेच मंडळाचे पूर्व अध्यक्ष दिगंबर माठेकर यांचा मंडळाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद चिटणीस यांनी केले.
या मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी सावंतवाडी तालुक्यातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो त्याचप्रमाणे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. तसेच या मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. याप्रसंगी मंडळाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, दिगंबर माठेकर सुरेश भोगटे, विलास जाधव, प्रदीप नाईक, संजय पेडणेकर,उमेश कोरगावकर, शिवराम गवळी तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा