You are currently viewing एम्पायर ग्रुप्स ऑफ कंपनीचे संतोष चव्हाण यांनी सिंधुदुर्ग कन्या अक्सा शिरगांवकर हिला दिल्या शुभेच्छा…

एम्पायर ग्रुप्स ऑफ कंपनीचे संतोष चव्हाण यांनी सिंधुदुर्ग कन्या अक्सा शिरगांवकर हिला दिल्या शुभेच्छा…

कणकवली  :

मध्यप्रदेश राज्यात गुंटूर येथे संपन्न झालेल्या एनटीपीसी नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप २०२४ – २५ तेरा वर्षाखालील वयोगटात सिंधुदुर्ग कन्या अक्सा मुदस्सर शिरगांवकर हिने तब्बल दोन सुवर्णपदकांना गवसणी घातली. अक्सा हिचे मायभूमी सिंधुदुर्गात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात अक्साहीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी एम्पायर ग्रुपस ऑफ कंपनीचे संतोष चव्हाण यांनी अक्सा हिचे यशाबद्दल कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अक्सा हिचे वडील मुदस्सर शिरगांवकर व आजोबा उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा