*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतच..माझं जगणं..!!*
आत्मनिष्ठ उणेपण घेऊन
कॅमेर्यासोबत जगत होतो
प्रेरणांना नांव ठेवत
स्वप्रतिमांना जपत होतो..!
स्वप्नांची दारे ..कॅमेर्यात बंद
नावलौकिकाची पर्वा नाही
भावनांची बेटं ..पाण्याखाली
अभिशापातून सुटका नाही..!
कॅमेर्याला सारखं वाटायचं
माझ्यासारखा कैदी असावा
आईला सारखं वाटायचं
पोरगा जगभर दिसावा..!
नावलौकिक लाभला नाही
ते..कॅमेर्याचं दुखणं होतं
पंख जळाले…. जरी
उंच उडायचं ….होतं..!
आई..तुझ्या जाण्यानं
उणेपण घेऊन जगतो
कॅमेर्यालाच सोबत घेऊन
स्वतःची समजूत घालतो..!
कॅमेर्यात न मावणारी माणसं
कधीच निघून गेली
स्मृतीही थकल्या जरी
कॅमेर्यानेचं नाती जपली..!!
✒️बाबा ठाकूर
कॅमेर्यासोबतच जगणं..माझं
बावन्नावी रचना