*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्रीस्वामीसमर्थ प्रकटदिना “निमित्त अप्रतिम काव्यरचना*
*सद्गुरू श्रीस्वामी समर्थ*
————————————-
गुरुमुर्ती पाहुनी नयनी
नतमस्तक स्वामी चरणी ।।
दत्तरूपात समर्थ तुम्ही
भक्तवत्सल हो एक तुम्ही
आस एक असे सदा मनी
नतमस्तक स्वामी चरणी ।।
नाना शंका, कुशंका या मनी
मन अस्थिर गेले होऊनी
भार टाकला तव चरणी
गुरुमुर्ती पाहुनी नयनी
नतमस्तक स्वामी चरणी ।।
कोलाहल हा धरेवरती
प्रयत्न सारे विफल होती
सामर्थ्य द्यावे समर्था आता
धीर संयम येऊ द्या मनी ।।
गुरुमुर्ती पाहुनी नयनी
अरुणदास “लीन स्वामी चरणी ।।
——————————————–
सद्गुरू श्रीस्वामी समर्थ
-अरुणदास”
अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
———————————————