You are currently viewing मा.राष्ट्रपतींचे मा. स्वीय सहाय्यक रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनचे उद्घाटन थाटात संपन्न

मा.राष्ट्रपतींचे मा. स्वीय सहाय्यक रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनचे उद्घाटन थाटात संपन्न

पुणे दि.31 : भारताच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक श्री रवींद्र जाधव यांच्या स्मृति निमित्त उभारण्यात आलेल्या श्री रविंद्र जाधव ग्लोबल फाउंडेशन या बहुप्रतिक्षित संस्थेचे भव्य उद्घाटन पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या संस्थेची स्थापना आरोग्य सेवा, शिक्षण आणि शाश्वत विकास या तीन मुख्य क्षेत्रांमध्ये सकारात्मक योगदान देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. उद्घाटनाच्या प्रस्तावनेत सुचेता रवींद्र जाधव यांनी त्यांच्या वडिलांचे धन्यवाद व्यक्त करत मिळालेल्या नावाबद्दल आम्हा सर्व बहिनींना अभिमान वाटतो असे नमूद केले.

याप्रसंगी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी रवींद्र जाधव ग्लोबल फाऊंडेशन साठी पाठविलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन त्यांच्या कन्या सौ ज्योती राठौर यांनी केले तसेच जाधव साहेब यांच्या स्मरणार्थ गौरवोद्गार काढले. प्रतिभाताई पत्रात म्हणाल्या रवींद्र जाधव साहेब अत्यंत शिस्तबद्ध आणि कर्तृत्ववान अधिकारी असल्याने त्यांना खाजगी सचिव म्हणून राष्ट्रपती भवनात नियुक्त केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत रवींद्र जाधव ग्लोबल फाऊंडेशनची स्थापना केल्याने नक्कीच फाउंडेशन ची वाटचाल यशस्वी होईल अशी शुभेच्छा दिली.

उद्घाटन सोहळ्यास शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. यामध्ये प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित डॉक्टर, पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणारे नेतृत्व आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा समावेश होता. त्यामध्ये

श्री मधुकर कोकाटे (भा.प्र.से.) माजी अध्यक्ष एम.पी.एस.सी. बोर्ड,महाराष्ट्र राज्य श्री.उमाकांत दांगट (भा.प्र.से.) माजी कृषी सचिव महाराष्ट्र राज्य श्री संभाजी सरकुंडे (भा.प्र.से.) माजी माहिती आयुक्त,महाराष्ट्र राज्य

श्री अरूण डोंगरे (भा.प्र.से.) माजी कार्यकारी संचालक, म्हाडा,महाराष्ट्र राज्य

श्री रामनाथ सोनवणे (भा.प्र.से.) माजी महानगर पालिका आयुक्त जळगाव,महाराष्ट्र राज्य

डॉ रवींद्र परदेशी, माजीप्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे

श्री गुलाबसिंह गिरासे, माजी वित्त संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सौ. ज्योती राठौर ,चेअरमन अक्षरा इंटरनेशनल स्कूल, पुणे

श्री जयेश राठौर, प्रख्यात आय.टी.तज्ञ, संचालक अक्षरा इंटरनेशनल स्कूल, पुणे

डॉ संदीप डोळे प्रख्यातनेत्रतज्ज्ञ, पुणे

श्री नरेशचंद्र काठोळे, संस्थापक अध्यक्ष, मिशन आय.ए.एस. अमरावती

सौ.स्नेहल भोसले, अपर जिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख . बार्टी,पुणे श्री विजयसिंह ठोके, माजी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ श्री योगेंद्र शितोळे देशमुख, आर.टी.ओ.इंस्पेक्टर

श्री राजेन्द्र राऊत,प्रकल्प प्रमुख ,एंमफॅसीस सॉफ्टवेअर श्रीप्रतीकपोतनीस,उद्योजक,ट्रयास को-वर्कींगश्री राजेन्द्र गील निव्रॄत्त प्रकल्प प्रमुख टाटा मोटर्स श्री सुहास गोखले निव्रॄत्त बैंकर यांचा समावेश होता.

प्रमुख अतिथी विभागीय आयुक्त श्री डॉ चंद्रकांत पुलकुंडवार(भा.प्र.से.)साहेबांच्या वतीने रवींद्र जाधव ग्लोबल फाऊंडेशन च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे विशेष बैठकीचे आयोजन केले असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवर संवाद साधला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या डॉ कांतीलाल संचेती(पद्मविभूषण पुरस्कारविजेते अस्थिरोग तज्ज्ञ) यांनी विशेष संदेश देऊन फाऊंडेशन चे कौतुक केले व रवींद्र जाधवसाहेबांच्या स्मॄतींना उजाळा दिला.

डॉ संदीप डोळे यांनी रवींद्र जाधव ग्लोबल फाऊंडेशन च्या माध्यमातून ५०० गरजु लोकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्याचे जाहीर केले.

मिशन आय ए एस या संस्थेचे संचालक सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ डॉ नरेश चंद्र काठोळे यांनी प्रशासकीय पदाच्या पुर्व परीक्षेची तयारी रवींद्र जाधव ग्लोबल फाऊंडेशन च्या माध्यमातून करण्यात येइल असे जाहीर केले व महाराष्ट्रभर फाउंडेशनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले.

माजी सनदी अधिकारी श्री संभाजी सरकुंडे म्हणाले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रवींद्र जाधव साहेबांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या या संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर घेण्यात यावे आणि त्या करीता सर्व निव्रॄत्त अधिकारी फाउंडेशन ला मदत करतील यात शंका नाही.

माजी सनदी अधिकारी श्री उमाकांत दांगट म्हणाले आज लोकल सोहळ्यात सुरू करण्यात आलेली संस्था एक दिवशी ग्लोबल फाऊंडेशन च्या नावारूपाला नक्की जाणार.

या विशेष प्रसंगी रवींद्र जाधव कुटुंबातील सर्व सदस्य आणि त्यांच्या मित्र परिवारानेही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून समाजहित साधण्याचा संकल्प करण्यात आला.

रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशन ही संस्था भविष्यात समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहील. पुणे येथून सुरू झालेला हा प्रवास देशभरात सामाजिक परिवर्तनाची चळवळ निर्माण करेल, असा विश्वास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विरेंद्र बोराडे यांनी व्यक्त केला.

“समाजाच्या भल्यासाठी नवे उपक्रम राबवून, गरजूंच्या जीवनात बदल घडवणे हेच आमचे ध्येय आहे,” असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विरेंद्र बोराडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले.

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती 9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा