You are currently viewing डिजीसीएच्या अहवालानंतर विमानतळ सुरू करण्याच्या वल्गना करणारे सत्ताधारी तोंडघशी…

डिजीसीएच्या अहवालानंतर विमानतळ सुरू करण्याच्या वल्गना करणारे सत्ताधारी तोंडघशी…

मनसेचे अमित इब्रामपूरकर यांची टीका ; विकासकामांबाबत सत्ताधाऱ्यांची खोटे बोला, पण रेटून बोला प्रवृत्ती

मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या दौऱ्यानंतर सत्ताधाऱ्यांना विमानतळाबाबत जाग

गेले महिनाभर सत्तेतील आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी चिपी विमानतळ आमच्यामुळेच सुरु होणार असे सांगत ठेकेदाराकडून निमंत्रण पत्रिका छापून घेतल्या. विमान काही दिवसात उडणार असल्याचेही भासवले. पण आता हेच लोकप्रतिनीधी डीजीसीआईच्या अहवालानंतर तोंडघशी पडल्याची टीका मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मनसे नेते परशुराम उपरकर यांनी दोन दिवसापुर्वी विमानतळ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन सदर विमानतळ अजुन महिनाभर तरी सुरु होणार नसल्याचे ठामपणे सांगितले होते. विमानतळाबाबत असलेली सत्य वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली होती.म्हणजेच मनसे जनतेशी खरं आणि प्रामाणिक वागत आहे तर सत्ताधारी जनतेला फसवत असल्याचे आता स्पष्ट होत आहे. विमानतळ प्रश्नाबाबत सत्ताधाऱ्यांची अवस्था उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशाप्रकारे दिसून येत आहे. खासदार विनायक राऊत यांनी निवडणुकीपुर्वी जाहीर केलेल्या बजेट मध्ये ११५ कोटी तरतुद असलेल्या आणि आता अंदाजपत्रक ५९० कोटी झालेल्या सोनवडे-घोडगे पुलाचे पुढे काय झाले ? जिल्ह्यातील अनेक विकासकामांबाबत खोटे बोला पण रेटून बोला ही सत्ताधाऱ्यांची वृत्ती जनतेनेही लक्षात घ्यावी.

एकीकडे सत्तेतील लोकप्रतिनिधी विमान उतरविण्याचे श्रेय घेत असतानाच मनसे नेते उपरकर यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या पाहणी दौऱ्यात विमानासाठी आवश्यक पायाभूत सुविधा वीज पाणी रस्ते अजूनही झालेले नाहीत हे जनतेसमोर स्पष्ट केले होते आणि म्हणूनच उपरकर यांच्या दौऱ्यानंतर पालकमंत्री, आमदार, खासदार यांना काल एकत्रित येऊन पाणी वीज रस्ते या पायाभूत सुविधांची उशिराने दखल घ्यावी लागली. वीज, पाणी, रस्ता या मूलभूत सुविधा होण्यासाठी शासनाच्या बजेटमध्ये तरतूद होणे आवश्यक होते. परंतु सत्ताधारी लोकप्रतिनिधी अकार्यक्षम असल्यामुळेच तसे होऊ शकले नाही. जिल्ह्यात असलेले सत्ताधारी निधी आणू शकत नाहीत. राष्ट्रवादीचे अजित पवार अर्थमंत्री आहेत ते शिवसेनेच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निधी देत नाहीत ही शोकांतिका आहे. त्यामुळेच हे लोकप्रतिनिधी वारंवार विमानतळावर पाहणी दौरा करण्याची नौटंकी करत जिल्ह्यातील जनतेला फसवत आहेत आणि विमानतळ उद्घाटनाच्या तारखा जाहीर करत आहेत, असे इब्रामपूरकर यांनी पत्रकात म्हटले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 15 =