*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*
*चैत्र शुद्ध प्रतिपदा* *(गुढी पाडवा)*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*ब्रह्मध्वज नमस्तेsस्तू सर्वाभीष्टफलप्रद।*
*प्राप्तयेस्मिन वत्सरे नित्यम मदगृहे मंगलम कूरु।।*
*भारतीय हिंदू पंचांग पद्ध्तीनुसार नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतिपदे पासून होते. आणि हा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे ” वर्षप्रतिपदा ” .*
*आणी या चैत्र प्रतिपदेपासून ते फाल्गुन वद्य आमावस्या पर्यंत या बारा महिन्यांचे हिंदू वर्ष असते आणि या बारा महिन्यात हिंदू आपले पारंपरिक सण आणि उत्सव उत्साहाने साजरे करतात त्यातला हा गुढीपाडवा हा पहिला सण मानला आहे.*
*या दिवशीच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आहे याचे वर्णन ब्रह्माण्ड पुराणात केले आहे.*
भरतभूमी ही देवदेवतांची ,ऋषिमुनि , तपस्वी , संत यांची आध्यात्मिक , विवेकी ,विचारवंतांची चारित्र्य संपन्न अशी भूमी आहे. या भूमीत प्राचीन काला पासून सर्वधर्मसमभाव जपला जात असून इथे समाजाच्या सांस्कृतिक परंपरेनुसार पारंपारिक सर्व सण , उत्सव एकात्मकतेने , आनंदाने साजरे केले जातात आणि त्या उत्सवांना धार्मिक , सामाजिक आणि पारंपरिक असे महत्व आहे. सर्वच धर्मांची मुलतत्वे ही निर्विवाद जगतकल्याणासाठी आहेत हे निर्विवाद.
भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते. हे आपल्याला प्राचीन आणि वेदकालीन , धर्मग्रंथाच्या अभ्यासातुन ( संदर्भातुन ) सहज दृष्टोतपत्तीस येते. भारतात साजरे केले जाणारे सर्वच भारतीय सण, उत्सव म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचे तसेच धार्मिक परंपरेचे प्रतिबिंब आहे .
प्रत्येक उत्सवाला संस्कार संस्कृतीची एक विशिष्ठ झालर आहे. वैशिष्ट्य आहे. कुठला सण कां ? केव्हा व कसा साजरा करावा त्याचे महत्व काय ?यालाही ऐतिहासिक दृष्टांतवजा धार्मिक , बौद्धिक , विवेकी अशी आध्यात्मिक , सामाजिक पार्श्वभूमी आहे त्याला अनुसरूनच हे उत्सव भारतात श्रद्धेने सर्वत्र साजरे केले जातात. आणि त्यातून भारताची सांस्कृतिक परंपरा जपली जाते हे वास्तव आहे.
भारतीय संस्कृती ही मुळातच *उत्सवप्रिय* आहे. त्यातून समाजात भावश्रद्धेने पारंपारिक प्रथा वर्षभर बारा महीने या सणोत्सवाच्या सात्विक परंपरेनुसार जपल्या जातात हे फार महत्वाचे आहे.
*वारकरी संप्रदायाची वारी देखील एक आत्मानंद असून मानवतेच्या एकात्मकतेचे सात्विक विलोभनिय असे अध्यात्मिक दर्शन आहे*
*चैत्रशुद्ध प्रतिपदा* म्हणजे *गुढीपाडवा* म्हणजे भारतीय हिंदू संस्कृती संस्कृतील पहिला धार्मिक सण.
या दिवशी सृष्टीत *मूर्तिमंत नवचैतन्याची प्रसन्न उधळण करीत येणाऱ्या वसंत ऋतुची सुरवात होते*
या उत्सवाबद्दल प्राचीन वेदकालीन अशा अनेक आख्यायिका आहेत. यादिवशी म्हणजे *चैत्रशुद्ध प्रतिपदेला* धर्मशास्त्रानुसार सृष्टिची निर्मिति ब्रह्मदेवाने सूर्योदयाच्या वेळी करुन या सृष्टिची ( जगाची ) निर्मिति केली आणि कालगणनेला प्रारंभ केला म्हणून आपण आनंदोत्सव म्हणून जी *गुढी* उभारतो गुढी म्हणजे *ब्रह्मध्वजाचे* प्रतीक मानले जाते.
या *चैत्रशुध्द प्रतिपदा* म्हणजेच *गुढीपाडवा* या सणाबद्दल अनेक आख्यायिका ( गोष्टी ) आढळून येतात.
त्यामध्ये शककर्ता *शालिवाहन* या राजाने *चैत्रशुद्ध प्रतिपदेपासुन* आपल्या शकाची सुरवात केली आणि निर्जीव ,निष्प्राण , दुर्बल ,हतबल झालेल्या समाजात जागृती , चैतन्य , अस्मिता निर्माण केली तो दिवस म्हणजे *चैत्रशुद्ध प्रतिपदा*.
त्याचप्रमाणे *रामायणात* देखील *प्रभुरामचंद्र* आपल्या 14 वर्षाच्या वनवसानंतर *रावणाचा* पराभव करून *विजयपताका* मिरवित *अयोध्यापुरीत* पुन्हा परतले आणि ध्वज ( गुढी ) उभारुन आनंदोत्सव / विजयोत्सव साजरा केला तो दिवस म्हणजे *गुढी पाडवा*
अशा अनेक आख्यायिकांचे संदर्भ अनेक धार्मिक ग्रंथातुन वाचावयास मिळतात.
म्हणून सर्वार्थाने सात्विक आनंदाचा विजयोत्सव साजरा करण्याची प्रथा *परंपरेनुसार गुढी उभारुन हा *गुढीपाडवा* सण साजरा केला जातो.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा *शुभमुहूर्त* मानला जातो.
आणि या दिवशी सर्व शुभकार्याची सुरुवात करण्याची प्रथा प्राचीन कालापासून आहे आणि हिंदूधर्मामध्ये
या दिवशी आपल्या घरावर सूर्योदयसमयी शुचुर्भूत होऊन बांबुवर चांदीचा कलश / तांब्या उपडा ठेवून , त्याला जरीचे वस्त्र (आजकाल भगवा झेंडा उभारुन ) साखरेची गाठी , गुळ , फुलांचा हार , धूपदीप ,नैवेद्य सकाळ , संध्याकाळ श्रद्धेने पूजा करुन हा *नववर्षातील पहिला चैतन्याचा *चैत्रशुद्ध प्रतिपदा* ( *गुढीपाडवा*)
सण साजरा करण्याची प्रथा अखंडित आहे*
*ब्रह्मध्वजायनम:*
*इती लेखन सीमा*
***********************
*वि.ग.सातपुते*
*अध्यक्ष:- महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे*
*📞( 9766544908 )*