*मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचा यश सावंत महावाचन स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम*
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या कु यश प्रवीण सावंत या विद्यार्थ्याने समग्र शिक्षा विभागामार्फत आयोजित महावाचन उत्सव २०२४ मध्ये इयत्ता ३ री ते ५ वी या स्तरातून सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत नेत्रदीपक यश संपादित केले आहे. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल समग्र शिक्षा, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग द्वारे त्यास सन्मानित करण्यात आले.बालवयातच आपल्या
अष्टपैलूपणाची चुणूक दाखवणाऱ्या कु. यश सावंत याने वाचनासोबत कथाकथन, वक्तृत्व , चित्रकला, बुद्धिबळ, पोवाडा गायन इत्यादी कला, क्रीडा व अनेकविध तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
यश सावंतच्या या यशाबद्दल सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी कौतूक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.