*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुढीपाडवा*🚩
आली वसंत चाहुल
चैत्र शुध्द नवमी सण
कुहू कुहु पंचम सुर
सांगे कोकिळेची ताण
आले नवीन वर्ष, हर्ष
डहाळीला नव पालवी
झाले गेले विसरून जाता
मरगळ सारी घालवी
गुढी उभारू चैतन्याची
गेली उंच गगनाला
आणा आंब्याची डहाळी
साडी नेसवा गुढीला
नक्षत्र चंद्रसूर्याचे
करूया आज पूजन
निरामय आरोग्याचे
कडूलिंबाचे सेवन
रीत संस्काराचे पूजन
कडू गोड निंब पाने
कंठी माळ साखरेची
गाऊ कौतुकाचे गाणे
*शीला पाटील चांदवड*