मालवण / वेरली:
हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त शनिवार,दि. २९ मार्च रोजी रात्री १० वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा विनोदी, संघर्षमय, पौराणिक ‘सहस्र नागबळी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग वेरली-सडेवाडी येथे होणार आहे. या नाट्यप्रयोगास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाश चव्हाण मित्रमंडळ आणि ग्रामस्थ-वेरली यांनी केले आहे.