You are currently viewing अंगणवाडी स्तरावरील उत्कृष्ट पुरस्कार जाहिर

अंगणवाडी स्तरावरील उत्कृष्ट पुरस्कार जाहिर

अंगणवाडी स्तरावरील उत्कृष्ट पुरस्कार जाहिर

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्ग कार्यरत असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मीनी  अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस यांनी अंगणवाडीस्तरावर उत्कृष्ठ काम केल्याबद्दल त्यांना सन 2024-25 चा जिल्हा परिषदेचा आदर्श पर्यवेक्षिका, आदर्श अंगणवाडी सेविका, आदर्श अंगणवाडी मीनी सेविका व आदर्श अंगणवाडी मदतनिस पुरस्काराची घोषणा प्रशाक तथा मुख्या कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 8 प्रकल्प कार्यरत असून याप्रकल्पात कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविका,मीनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस यांना प्रती वर्षी अंगणवाडी स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामासाठी पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. यामध्ये जिल्ह्यामधून 2 पर्यवेक्षिका व प्रत्येक प्रकल्पातून एक अंगणवाडी सेविका 1 मीनी सेविका व 1 मदतनिस मिळून एकूण 26 कर्मचारी यांची जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यासाठी प्रकल्पस्तरावर गुणांकनाव्दारे आदर्श कर्मचारी यांची निवड केली जाते. सन 2024-25 या वित्तिय वर्षामध्ये प्रकल्प स्तरावर 1 मिळून एकूण 8 अंगणवाडी सेविका 8 अंगणवाडी मिनी सेविका  8 अंगणवाडी मदतनिस व जिल्हयातून 2 पर्यवेक्षिका मिळून एकूण 26 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली असून निवड करतांना सन 2023-24 या वित्तिय वर्षात केलेल्या कामाचे मुल्यमापन करण्यात आलेले आहे.

आदर्श अंगणवाडी कर्मचारी म्हणून अंगणवाडी सेविका-8 मीनी सेविका-8 अंगणवाडी मदतनिस-8  व पर्यवेक्षिका-2 यांच्या नावांची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केली आहे.

त्यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.), जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) सोमनाथ रसाळ उपस्थित होते.

 

महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची जिल्हा आदर्श पुरस्कार सन 2024-25 ची निवड यादी
अ.क्र. प्रकल्प बीट अंगणवाडी केंद्र नाव पुरस्कार्थी नाव पद प्राप्त गुण शेरा
1 देवगड मिठबांव कोटकामते देऊळवाडी श्रीम.आरती विनोद कामतेकर अंगणवाडी सेविका 90 निवड
2 देवगड पडेल नं.1 पडेल बेलवाडी श्रीम.पुजा प्रसाद रानडे मिनी अंगणवाडी सेविका 86 निवड
3 देवगड मोंड रहाटेश्वर श्रीम.मिनाक्षी गुरुनाथ मांडवकर अंगणवाडी मदतनिस 92 निवड
4 वैभववाडी उंबर्डे उंबर्डे मेहबुबनगर श्रीम.शायरा मेहरअल्ली रमदूल अंगणवाडी सेविका 98 निवड
5 वैभववाडी वैभववाडी क्र.2 करुळ भोयाडेवाडी श्रीम.राजश्री राजेंद्र जांभळे मिनी अंगणवाडी सेविका 97 निवड
6 वैभववाडी वैभववाडी क्र.1 कोकिसरे विदयामंदिर श्रीम.अनिता अनंत कुडाळकर अंगणवाडी मदतनिस 98 निवड
7 कणकवली नांदगांव कोंडये गावठण श्रीम.प्रमिला प्रकाश फोपे अंगणवाडी सेविका 95 निवड
8 कणकवली कळसुली बोर्डवे ग्रामपंचायत श्रीम.सीताबाई रामचंद्र शिंदे मिनी अंगणवाडी सेविका 92 निवड
9 कणकवली नांदगांव कोंडये गावठण श्रीम.वनिता चंद्रकांत पेडणेकर अंगणवाडी मदतनिस 93 निवड
10 मालवण चौके नं.1 नांदोस लक्ष्मी नारायण श्रीम.स्नेहलता सहदेव शिरवंडेकर अंगणवाडी सेविका 85 निवड
11 मालवण आचरा नं.2 मठबुद्रुक लिंग्रसवाडी (मिनी) श्रीम.आर्या अमित मेस्त्री मिनी अंगणवाडी सेविका 87 निवड
12 मालवण आचरा-1 श्रावण परबवाडी श्रीम.नुतन तुषार श्रावणकर अंगणवाडी मदतनिस 93 निवड
13 कुडाळ वालावल पाट गजानन श्रीम.अलका सुहास पाटकर अंगणवाडी सेविका 94 निवड
14 कुडाळ माणगांव-2 गोठोस देऊळवाडी श्रीम.संजिवनी सिताराम नाईक मिनी अंगणवाडी सेविका 92 निवड
15 कुडाळ माणगांव-1 आकेरी ग्रामपंचायत श्रीम.साक्षी संजिव साळगांवकर अंगणवाडी मदतनिस 92 निवड
16 वेंगुर्ला परुळे परुळे कर्ली श्रीम.विनया सुहास बोवलेकर अंगणवाडी सेविका 84 निवड
17 वेंगुर्ला तुळस उभादांडा रामघाट श्रीम.स्वराली स्वप्निल नवार मिनी अंगणवाडी सेविका 88 निवड
18 वेंगुर्ला परुळे परुळे कर्ली श्रीम.मनिषा महादेव दुधवडकर अंगणवाडी मदतनिस 85 निवड
19 सावंतवाडी आंबोली चौकुळ गोणसाठवाडी श्रीम.अनुष्का अर्जुन परब अंगणवाडी सेविका 83 निवड
20 सावंतवाडी निरवडे-2 नेमळे गावडेवाडी श्रीम.शितल लवू गावडे मिनी अंगणवाडी सेविका 86 निवड
21 सावंतवाडी आंबोली चौकुळ गोणसाठवाडी श्रीम.वेदांती विजय गावडे अंगणवाडी मदतनिस 89 निवड
22 दोडामार्ग दोडामार्ग आयी किटवाडी श्रीम.तनुजा प्रकाश आरभावी अंगणवाडी सेविका 89 निवड
23 दोडामार्ग मोरगांव भिकेकोनाळ (मिनी) श्रीम.आदिती बाळानंद देसाई <

प्रतिक्रिया व्यक्त करा