You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मार्च अखेरचे कारण देत गुढीपाडवा सणाची सुट्टी केली रद्द

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मार्च अखेरचे कारण देत गुढीपाडवा सणाची सुट्टी केली रद्द

*सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मार्च अखेरचे कारण देत गुढीपाडवा सणाची सुट्टी केली रद्द*

*भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्ववादी ब्रँड म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद मार्फत हिंदू नववर्ष सणावर निर्बंध घातलेली बंदी उठवणार का? मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी असल्याचे कारण देत जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील सर्व कर्मचाऱ्यांना पुढील तीन दिवस कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याच तिन दिवसांमध्ये येत्या रविवारी हिंदू नववर्ष प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा सण साजरा होणार आहे. अशातच मुख्याधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या आदेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करणेवर हिंदुत्ववादी सरकारच्या कार्यकाळात निर्बंध येणार आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग मार्फत अख्ख्या महाराष्ट्रात स्वतःला हिंदुत्ववादी ब्रँड म्हणून दाखवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी हिंदु सणावर घातलेले निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा