साहित्यिकांची विविध उपक्रमे आयोजित करणाऱ्या ‘रेणुका आर्टस्’ने राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा, २०२५ आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी ‘प्रेम’ हा विषय असून कथालेखनाची शब्द मर्यादा ७५०-८०० शब्द आहे. प्रेम, अडीच अक्षरांचा हा शब्द दिसायला आणि उच्चारायला खूप छोटा असला तरी याची व्याप्ती फार मोठी आहे. प्रेम नातेसंबंधातलं असू शकतं, निसर्गावर असू शकतं, देशावर असू शकतं, इ. इ.
👉 स्पर्धेसाठी ‘प्रेम’ हा विषय असला तरीही आपली कथा अश्लीलतेकडे झुकणारी नसावी. तसंच कथेत द्विअर्थी संवाद, शब्द नसावेत. धर्म, राजकारण हे विषय कटाक्षाने टाळावेत. ❌ आपण पाठवत असलेल्या कथेमुळे इतरांच्या भावना दुखावू नयेत. . 🙌🏻
एक स्पर्धक स्पर्धेसाठी फक्त एक कथा पाठवू शकेल. कथा मराठी भाषेत लिहिलेली असावी. कथेला समर्पक शीर्षक असावं. कथा हस्तलिखित, pdf किंवा फोटो स्वरूपात पाठवू नये. आपण व्हाट्सअप वर संदेश पाठवतो, तशी पाठवावी. कथा पाठवताना वर ‘रेणुका आर्टस् आयोजित कथालेखन स्पर्धा, २०२५’ चा उल्लेख करून त्याखाली तारीख लिहावी. ✍🏻
कथालेखन स्पर्धेसाठी साधारण आशय, कथेची मांडणी, कथा विषयाला धरून आहे की नाही?, कथेचा शेवट, एकूण परिणामकारकता हे निकष असतील.
पुरस्कार स्वरूप –
प्रथम क्रमांक – रुपये ७५०/- + डिजिटल प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक – रुपये ५००/- + डिजिटल प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक – रुपये ३००/- + डिजिटल प्रमाणपत्र
सर्व स्पर्धकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच कथालेखन स्पर्धेतील सर्व स्पर्धक त्यांनी लिहिलेल्या कथांचे रेकॉर्डेड व्हिडियोज Renuka Arts च्या युट्युब चॅनलवर पोस्ट होतील. त्यासाठी योग्य वेळेस सूचना देण्यात येतील.
स्पर्धेचे प्रवेश शुल्क (रुपये १००/-) ९६६२०४३६११ या गुगल पे क्रमांकावर पाठवून त्याचा स्क्रिनशॉट, तुम्ही लिहिलेली कथा, शहर, मोबाईल नंबर आणि शब्दसंख्या लिहून त्याच नंबरवर (९६६२०४३६११) पाठवावी.☝🏻
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क जमा करून कथा पाठवण्याची अंतिम मुदत ९ एप्रिल, २०२५ आहे.
‘रेणुका आर्टस्’तर्फे नुकतीच काव्यलेखन स्पर्धा व अलक लेखन स्पर्धा आयोजित केली होती. सध्या ३० मार्च, २०२५ तारखेपर्यंत चारोळी लेखन स्पर्धा नावनोंदणी सुरु आहे. अधिक माहितीसाठी ९६६२०४३६११ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.