You are currently viewing वैभववाडीत उबाठा सेनेचे लोरे माजी सरपंच नाना रावराणे यांच्यासह बूथप्रमुख सत्यजित रावराणे भाजपात दाखल

वैभववाडीत उबाठा सेनेचे लोरे माजी सरपंच नाना रावराणे यांच्यासह बूथप्रमुख सत्यजित रावराणे भाजपात दाखल

वैभववाडीत उबाठा सेनेचे लोरे माजी सरपंच नाना रावराणे यांच्यासह बूथप्रमुख सत्यजित रावराणे भाजपात दाखल

वैभववाडी :

लोरे नं. २ येथील उबाठा सेनेचे बूथप्रमुख सत्यजित रावराणे आणि नाना रावराणे यांनी बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे उबाठा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

हा पक्षप्रवेश ओम गणेश निवासस्थानी येथे संपन्न झाला. यावेळी लोरे सरपंच विलास नावळे, भास्कर पांचाळ, प्रकाश गव्हाणकर, बंटी रावराणे, मंदार रावराणे, तेजस रावराणे, आचिणे सरपंच वासुदेव रावराणे, संतोष रावराणे आणि सुनील रावराणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपात प्रवेश केल्यानंतर सत्यजित रावराणे व नाना रावराणे यांनी पक्षासाठी निष्ठेने कार्य करण्याची ग्वाही दिली. मंत्री नितेश राणे यांनी त्यांचे भाजपात स्वागत करताना पक्ष वाढीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा