नापणेची कु.भक्ती कोकरे महाराष्ट्र क्रिकेट संघात
तळेरे
नापणे गावची सुकन्या कु.भक्ती विजय कोकरे हिची महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली आहे. महाराष्ट्र संघातून ओरिसा ‘भुवनेश्वर’ येथे होणाऱ्या व ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मार्फत दि.९ते १४मार्च २०२१या कालावधीत होणा-या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत ती महाराष्ट्र संघातून खेळणार आहे.
महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मार्फत नाशिक येथे संपन्न झालेल्या राज्य स्पर्धेतील उत्तम कामगिरीवरून तीची निवड करण्यात आली आहे.
कु.भक्ती कोकरे हिने माधवराव पवार माध्यमिक विद्यालय कोकिसरे शाळेतून खेळताना तीने यापूर्वी शालेय स्पर्धेत तालुका, जिल्हा आणि विभागस्तरावरही सिझन बाॅल क्रिकेट स्पर्धेत उज्वल यश संपादन केले असून गेल्या तीन वर्षापासून ती माधवराव पवार माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रामचंद्र घावरे,तसेच स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा कसून सराव करीत होती.
सध्या ती हेमंत केशवराव रावराणे ज्यु. काॅलेज वैभववाडी येथे इ.११वी सायन्स मध्ये शिकत आहे.
कु.भक्ती कोकरे ही नापणेसारख्या ग्रामीण भागातील क्रिकेटमधील गुणी खेळाडू असून ती शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक तथा ऑल इंडिया धनगर समाज सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विजय कोकरे यांची कन्या आहे.भक्तीला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड आहे.
या यशस्वी खेळाडूला सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे कोच कुणाल हळदणकर, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी मिनाक्षी गिरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.
तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
कू.भक्ती कोकरे