You are currently viewing काळे कॉलनीतील पाणी  पुरवठा सुरळीत करा….

काळे कॉलनीतील पाणी  पुरवठा सुरळीत करा….

काळे कॉलनीतील पाणी  पुरवठा सुरळीत करा….

नगरसेवक अँड सचिन काळे दिला यांची मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याकडे निवेदनातुन मागणी.

काळे कॉलनीमध्ये आळंदी नगरपरिषदेच्या वतीने चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.वारंवार पाणी सोडण्याच्या वेळाही पाणीपुरवठा अधिकारी बदलत आहेत. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा अधिकारी श्रद्धा गर्जे यांचे कोणतेही पाणीपुरवठ्यासंबंधी नियोजन नाही, शिवाय नागरिकांचा फोन उचलत नाहीत,नागरिकांना माहिती देत नाहीत, नागरिकांना स्वखर्चाने टंँकरने पाणी विकत घ्यावे लागते ,शिवाय नगरपरिषदेकडे टँकर उपलब्ध नाही म्हणून त्या नागरिकांना सांगत असतात. यामुळे नागरिक आमच्याकडे दररोज पाण्याची तक्रार घेऊन माझ्याकडे येत असल्याचे नगरसेवक अँड सचिन काळे यांनी सांगितले,नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून खुप मानसिक त्रास ही सहन करावा लागत आहे.असाच पाणीपुरवठा विस्कळीत राहिला तर मी व सर्व काळे कॉलनीतील नागरिकांना घेऊन नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा त्यांनी नगरपरिषदेचे सि.ईओ.माधव खांडेकर यांना दिला.

यावेळी अँड सचिन काळे,महादेव पाटील, मंगेश काळे, आत्माराम काकडे,दिगंबर सुतार,अनिल मोकाशी लक्ष्मण कवडे,राहुल व्यवहार,उर्मिला भारती ,सचिन थोरात,नारायण गिरी,तुकाराम कदम किरण ,सुतार वसंत चौधरी मनोहर ढोकणे सह अनेक नागरिक उपस्थित होते

———————————————–

*संवाद मीडिया*

👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓

*_डी जी बांदेकर ट्रस्ट मध्ये ऍडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा…._*

सावंतवाडीतील प्रसिद्ध डी.जी. बांदेकर ट्रस्ट घेऊन आले आहेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भवितव्यासाठी आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस.. आणि *एक वर्ष फाउंडेशन कोर्स*

_होय… आता चित्रकला शिकण्यासाठी मुंबई पुण्यात जाण्याची गरज नाही…_

_आमच्या संस्थेत या आणि बदलत्या शिक्षणा प्रकारासोबत नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना शिका._

_मुंबई विद्यापीठाचे चार वर्ष डिग्री कोर्स साठी लागणाऱ्या सीईटी परीक्षेविषयी पूर्वकल्पना व सराव होण्याच्या दृष्टीने एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स_

_यु,आय, यु एक्स सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाईन, क्राफ्ट, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, डुडलिंग,क्ले मॉडलिंग ॲनिमेशन इत्यादी गोष्टी विषय मूलभूत माहिती संधी…_

_👉विशेष म्हणजे फाउंडेशन कोर्स साठी कोणत्याही सीईटी परीक्षेची गरज नाही._

_शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी_
_प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू…_
तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी दर शनिवार आणि रविवार *आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस*

*(वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेची अट नाही)*

_चला तर मग कोर्ससाठी प्रवेश घ्या आणि छंदासोबत कलेची आवड जोपासा…_

*अधिक माहितीसाठी*👇

*तुकाराम मोरजकर*
*📲9405830288*

*सिद्धेश नेरुरकर*
*📲9420260903*

*जाहिरात लिंक*👇
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा