You are currently viewing सावंतवाडी बाजारपेठ रस्ता २८ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत बंद 

सावंतवाडी बाजारपेठ रस्ता २८ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत बंद 

सावंतवाडी बाजारपेठ रस्ता २८ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत बंद

सावंतवाडी

शहरातील बाजारपेठ रस्ता २८ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत बंद राहील, असे न.प.तर्फे कळविण्यात आले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने मुख्य बाजारपेठेमध्ये आ. क्र. ४६ शॉपिंग सेंटर विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामामधील बाळकृष्ण कोल्ड्रिंक्स ते भांगले पेट्रोल पंप या भागातील खोदाई व फुटिंगचे काम करायचे आहे. हे काम करण्यासाठी सुमारे २० दिवस रस्ता बंद ठेवणे आवश्यक आहे. बाजारपेठेतील या रस्त्यावर नागरिक व वाहनांची फारच वर्दळ असते. त्यामुळे बाळकृष्ण कोल्ड्रिंक्स ते भांगले पेट्रोल पंप या रस्त्यावरील वाहतूक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बंद ठेवणे आवश्यक आहे. बाजारपेठेत जाण्यासाठी इतर पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. बाळकृष्ण कोल्ड्रिंक्स ते भांगले पेट्रोल पंप या रस्त्यावरील वाहतूक २८ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिक व वाहनधारकांनी आनंद भुवन ते भाट पेट्रोल पंप तसेच वक्रतुंड लॉज ते मँगो हॉटेल या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा