*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*
*श्रुंगारपेटी*
तेव्हाच्या गृहिणी भल्या पहाटे उठून झाडलोट,सडा,रांगोळी आटपत.. स्नान करून रहाटाचं पाणी काढून पूजा स्वैंपाक .. सोवळं किंवा आडजुन्या लुगड्यावरच सकाळची सारी कामे आटोपत.दुधदुभतं ,रवी,तूप करणं..तेही सगळं तिचंच काम…
मग सगळ्यांची जेवणं आटोपून तिचं जेवण आणि आवरणं….
तेव्हा कुठे श्रुंगारपेटी तिच्या हाती येत असे…सुंदर लाकडी नक्षीदार ..
झाकणात आरसा असलेली…. त्यातील लाकडीफणीने.तेल लावलेल्या केसांचा .भरगच्च अंबाडा त्यावर एकादे असेल ते कुठलेही फूल किंवा पाकळी लावत.अच्चू कुंकू लावायची बहुधा चांदीची चपटी काडी व खाली कुंकू लावायचा गोल असायचा.तो नाकाचे माप घेऊन सरळ मधोमध ठेऊन मेण
लावत ,त्यावर लालचुटुक कुंकू
एकसारखे दाबत..मग काडी काढून इकडे तिकडे जरासं लागलेलं,नाकावर सांडलेलं कुंकू म ऊ मलमलच्या कपड्याच्या छोट्याशा तुकड्याने व्यवस्थित पुसायचं.
पावडर नीट करायचं..काजळ ,घरीच केलेलं डोळ्यांना कडांना वर खाली व्यवस्थित लावायचं..मग फणेरपेटीच्या आरशातच निरखून.बघायचं.. पेटी बंद करत
नंतर छानसे फुलाफुलांचे सुंदर नऊवार पातळ नेसत.डोक्यावर व्यवस्थित पदर घेत …आता कुठे ओसरीवरच्या बंगईवर निवांत बसत. सगळ्यांशी गप्पागोष्टी.करायला…
ही अर्धा पाउण तासाची त्यांची तयारी आम्ही नाती खूप उत्सुकतेने रोजच बघायचो.👍
आत्याचे केस तर खूपच जाड आणि लांब…ती केसांचे दोन भाग करून आधीएक अंबाडा व त्यावर उरलेल्या केसांचा चोपून विंचरलेला पिळा आकड्यांनी घट्ट बसवायची. दुसर-या दिवशीपर्यंत त्यातील एक केसही हलत नसे. आता वेणीच दुर्लभ तर अ़ंबाडा कसा असणार….✒️
पण आठवणींची रेशीमलड कधीतरी कशावरून तरी उलगडते मनात अचानक …!👍
*अरुणा दुद्दलवार@✍️*