You are currently viewing भाजप युवा मोर्चा कुडाळ तालुका सरचिटणीस पदी मनोरंजन सावंत तर वेताळ बांबर्डे विभागीय अध्यक्षपदी विनोद सावंत यांची निवड

भाजप युवा मोर्चा कुडाळ तालुका सरचिटणीस पदी मनोरंजन सावंत तर वेताळ बांबर्डे विभागीय अध्यक्षपदी विनोद सावंत यांची निवड

कुडाळ :

ओरोस येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा च्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली व भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुक्याची उर्वरित कुडाळ तालुका युवा मोर्चा ची तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार प्रदेश सचिव श्री निलेशजी राणे, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनुसार कुडाळ तालुका ओरोस मंडल च्या सरचिटणीस पदी मनोरंजन विश्वास सावंत वेताळ-बांबर्डे जि प विभागीय अध्यक्ष पदी विनोद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, युवा मोर्चा संघटक सरचिटणीस संदिप मेस्त्री, आनंद शिरवलकर, कुडाळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, ओरोस मंडल तालुका अध्यक्ष श्रीपाद उर्फ पप्या तवटे, सोशल मीडिया युवा मोर्चा जिल्हा संयोजक राजवीर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूलकर तसेच जिल्ह्यातील युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ओरोस येथे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 10 =