You are currently viewing वेत्ये सरपंच श्री गुणाजी गावडे यांच्या वतीने श्री कलेश्वर विद्या मंदिर मधील मुलांना वह्या व छत्र्यांचे वाटप

वेत्ये सरपंच श्री गुणाजी गावडे यांच्या वतीने श्री कलेश्वर विद्या मंदिर मधील मुलांना वह्या व छत्र्यांचे वाटप

सावंतवाडी

श्री कलेश्वर विद्या मंदीर शाळेत ग्रामपंचायत कार्यालय वेत्ये सरपंच श्री गुणाजी गावडे यांच्या वतीने शाळेतील सर्व मुलांना वह्या व छत्री वाटप कार्यक्रम करण्यात आला.यावेळी श्रीम शितल खांबल उपसरपंच श्री महेश गावडे सदस्य श्री भगवान गावडे सदस्य श्री परशुराम पाटकर शाळा व्यवस्थापन कमिठी अध्यक्ष श्री शरद जाधव श्री संतोश गावडे कु. गिरीश खांबल यांच्या उपस्थितीत शाळेतील मुलांना वह्या व छत्री वाटप करण्यात आल्या.

श्री भगवान गावडे सदस्य व श्री महेश गावडे सदस्य श्री परशुराम पाटकर शाळा व्यवस्थापन कमिठी अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तसेच आमच्या वेत्ये गावातील अंगणवाडी मुलांना श्री गुणाजी गावडे सरपंच यांनी स्वखर्चातून गणेशवेश देण्यात आले याबद्दल अंगणवाडी सेविका यांनी आभार मानले.

तसेच सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त करून मुलांना चांगले मार्गदर्शन केले.तसेच शाळेतील शिक्षकवर्ग व मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांनी आमच्या ग्रामपंचायत वेत्ये सरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचे वेळोवेळी करत असलेल्या सहकार्या बद्दल खूप खूप आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + two =