पाळयेत बिबट्याकडून बकरीचां फडशा
दोडामार्ग
तिलारी खोऱ्यातील पाळये येथे बिबट्याने दोन बकऱ्यांचा फडशा पाडला आहे त्यामुळे शेतकरी चिमणू गंगाराम वरक यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचा वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकरी चिमणू वरक यांनी केली आहे. ही घटना घडल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला
पाळये येथील शेतकरी चिमणू गंगाराम वरक हे मोठ्या प्रमाणात शेळी पालन करतात. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. रविवारी रात्री शेळ्यांच्या गोठ्यात बकऱ्या ओरडण्याचा मोठा आवाज आल्याने वरक कुटुंबीय जागे झाले. सावधगिरी बाळगत त्यांनी गोठ्याजवळ जाऊन पाहिले असता एका बिबट्याने बकरीचा फडशा पाडल्याचे त्यांनी पाहिले. बिबट्या वरक कुटुंबियांवरही चाल करून येत होता. मात्र त्यांनी स्वतःला व कुटुंबीयांना मोठ्या चपळाईने वाचविले. काही क्षणातच बिबट्याने जंगलात धूम ठोकली. त्यानंतर गोठ्यात जाऊन पाहिले असता बिबट्याच्या हल्ल्यात दोन बकऱ्या मृत्युमुखी पडल्याचे त्यांना दिसले. शासनाने नुकसानीची भरपाई त्वरीत द्यावी अशी मागणी वरक कुटुंबाने केली आहे. सोमवारी सकाळी दोडामार्ग वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान पाळये गावातील दिनकर शिरसाठ यांच्या घरी कुत्रा अंगणात बांधलेला होता त्याच्यावर हल्ला करून एक पायाच जायबंदी केला आहे या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली आहे.