You are currently viewing जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी असली तरी मी तळागाळातला तुमच्यातलाच एक कार्यकर्ता….

जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी असली तरी मी तळागाळातला तुमच्यातलाच एक कार्यकर्ता….

जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी असली तरी मी तळागाळातला तुमच्यातलाच एक कार्यकर्ता

– ‌नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजू ऊर्फ सच्चिनदानंद परब

सावंतवाडी

मला पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची जरी मोठी जबाबदारी दिली असली तरी मी तळागाळातला तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. मी पण सर्वसामान्यांमधून आलेला कार्यकर्ता आहे. मी जिल्ह्यात शंभर टक्के पक्ष संघटना वाढविणार असून आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला कशाप्रकारे संधी देता येईल याकडे लक्ष केंद्रित करणार असल्याची ग्वाही शिवसेना पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजू ऊर्फ सच्चिनदानंद परब यांनी दिली.

येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आज जिलाध्यक्ष संजू परब यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, महिला जिल्हाप्रमुख निता सावंत कविटकर, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुका संघटक गोपाळ गवस, उपतालुकाप्रमुख मायकल लोबो, दादा देसाई, तिलकांचन गवस, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, उपविभाग प्रमुख कोलझर राजेश गवस, यांसह मायकल लोबो, विनायक शेटये, समीर देसाई, राकेश धर्णे, विनय दळवी, अमरसिंग राणे, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, रसिका गावडे, विठोबा पालेकर, राजन गवस, चंद्रकांत शिरोडकर, सुमन डिंगणेकर, एकनाथ गवस आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. परब पुढे म्हणाले की, आपण आपल्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला अधीन महत्व देणार असून त्यांच्या गावातील विकास कामे पूर्ण करण्यावर भर देणार आहे. तसेच यापुढे आपण पक्ष संघटनेला अधिक महत्त्व देणार आहे त्यामुळे पक्षातील एकही पदाधिकाऱ्याने पक्षाच्या कामात टंगळमंगळ करू नये. पक्ष वरिस्थाने दिलेल्या आदेशाचे पालन करून कामे करावीत. जिल्हाध्यक्ष म्हणून माझी ज्या ठिकाणी गरज असेल तेव्हा मी नक्कीच उपस्थित राहणार असल्याचेही संजू परब यांनी सांगितले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्या दौऱ्याच्या अनुषंगानेही संजू परब यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व दौऱ्याचे नियोजन सांगितले.
………………
दरम्यान तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस म्हणाले की, तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून जो आदेश देणार त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत. तुम्ही ज्या काही आमच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देणार आहात त्या सर्व काटेकोरपणे पार पाडू असेही श्री. गवस यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा