You are currently viewing शिवडाव हत्तीचे पाऊल ते लिंगेश्वर मंदिर कळसुली जोडणाऱ्या रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

शिवडाव हत्तीचे पाऊल ते लिंगेश्वर मंदिर कळसुली जोडणाऱ्या रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

कणकवली :

कणकवली येथील नाटळ जिल्हा परिषद मतदार संघातील शिवडाव हत्तीचे पाऊल ते लिंगेश्वर मंदिर कळसुली जोडणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थित करण्यात आले. सदरचा हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा असून त्याला ७ कोटी ७६ लाख ५१ हजार एवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या आभार मानले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष संदीप सावंत व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना संदेश सावंत यांचे देखील शिवडाव ग्रामस्थ यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. या भूमिपूजन प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, शिवडाव ग्रामपंचायत सदस्य नितीन गावकर, चंदू शिरसाठ व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा