पुणे :
महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र या साहित्य क्षेत्रातील ख्यातनाम संस्थेतर्फे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील उद्यान प्रसाद कार्यालयात केले होते.
पुणे तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून सुमारे 60/65 कवी/ साहित्यिक उपस्थित होते. प्रत्येकाने आपली प्रासादिक लोककला उत्तम अभिनयासह सादर केली त्यात आरती , अभंग , ओव्या , भारुड , पिंगळा , भोंडला , गौळण , वासुदेव , गोंधळी , पोवाडा , जागर , अशा विविध लोककलांचे उत्तम सादरीकरण केले.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक , भावकवी , संपादक *वि.ग.सातपुते. कार्याध्यक्ष काकासो चव्हाण , उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. ठाकुरदास , उपाध्यक्ष ऍड. संध्या गोळे , प्रा. डॉ. लक्ष्मण शिवणेकर (मुंबई ) तसेच इतर मान्यवर कवी/कवयित्री उपस्थित होती. या सर्वांची समयोचित भाषणे झाली त्यात *भारतीय पारंपारीक लोककलांची ओळख आणि संस्कार आज नवीन पिढीवर होणे अत्यन्त गरजेचे आहे असे विचार प्रत्येकाने मांडले.*
कलियुगातील भौतिक सुखाच्या लालसेपोटी समाज भरकटत चालला आहे हे वास्तव आहे तरी या प्राचीन लोककलांच्या माध्यमातुम *समाज परिवर्तनाचे , समाज प्रबोधनाचे नैतिक कार्य केले जाते तेंव्हा अशा लोककला आपण जपल्या पाहिजेत असे उद्गार वि.ग. सातपुते यांनी काढले.*
कार्यक्रमात खालील मान्यवर कवी/ साहित्यिक यांनी आपली लोकगीते सादर केली.
ज्येष्ठ कवयित्री सुनेत्रा गायकवाड , योगिता कोठेकर , डॉ. मानसी पाटील (मुंबई ) , सौ. ऐश्वर्या डगावकर ,(इंदूर ) पुष्पाताई कुलकर्णी , अंजली महाजन , रामचंद्र किल्लेदार ( ग्वाल्हेर )
डॉ. लक्ष्मण शिवणेकर , मीनाताई सातपुते , विजय जाधव , ज्योतीताई सरदेसाई , शुभदा जोशी., शुभदा उदगावकर , मनीषा साने , अनिल कुलकर्णी , केतकी देशपांडे , सरोजिनी दाते , स्मिता कुलकर्णी , शुभदा मित्रगोत्री , मनीषा सराफ , मिनाक्षीताई नवले , अश्विनी पिंगळे ,
ऍड पाचूनकर , राम सर्वगोड , मनिषा आवेकर , भाग्यश्री दायमा , नंदकिशोर गावडे , सतीश शिंगवेकर , प्रभा कुलकर्णी , अमिता परब , सुलभा बारकुंड , मनीषा वझे , अंजली डोळे , राजन चक्के , जया ठाकुरदास , जिज्ञासा ठाकुरदास , सुधीर कुबेर,सौ भाग्यश्री दायमा, प्रार्थना सदावर्ते,बंडा जोशी,सौ. राधिका दाते. ऍड. संध्या गोळे , सौ. वंदना घाणेकर , मकरंद घाणेकर , डॉ. संजीवनी महाजन , यशवंत देव , किरण जोशी , बाबासाहेब ठाकूर , डॉ .जनार्दन भोसले , या सर्वांनी आपली लोकगीते सादर केली. कार्यक्रम नियोजन कविवर्य मकरंद घाणेकर , यशवन्तजी देव , राधिका दाते , वंदना घाणेकर , यांनी केले तर कवयित्री ऋचा कर्वे यांनी सूत्रसंचालन केले . सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.