You are currently viewing मालवणात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १०३ प्रकरणे निकाली

मालवणात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १०३ प्रकरणे निकाली

मालवणात राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १०३ प्रकरणे निकाली

मालवण

दिवाणी न्यायालय मालवण येथे शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी २१ प्रकरणे व वादपूर्व प्रकरणांतील ८२ प्रकरणे अशी मिळून एकुण १०३ प्रकरणे तडजोडीने मिटवून निकाली काढण्यात आली. प्रलंबित व वादपूर्व प्रकरणामधील एकूण रक्कम रुपये ५ लाख ५० हजार ३९९ एवढी झालेली आहे.

सदर लोक अदालतीसाठी एक पॅनेल बनविण्यात आले होते. पॅनेल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश, मालवण तथा तालुका विधी सेवा समिती मालवणचे अध्यक्ष एम. आर. देवकते यांनी काम पाहिले असून विधिज्ञ ए. एस. सामंत यांनी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच न्यायालयाचे कर्मचारी सहायक अधीक्षक, एम. एम. मोर्ये, लघुलेखक डी. डी. तिबिले, वरिष्ठ लिपिक डी. डी. तवटे, यु. एन. मालणकर, कनिष्ठ लिपिक ओ. एस. हळदणकर, सी. एम. गोसावी, एम. पी. जाधव तसेच एच. व्ही. कामतेकर व पी. आर. गवस यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा