*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धनी न झालो “पापाचे”*
नजर भिडवून नजरेला
कशास आव्हान तू देतेस
गुलाब दाखवून शुभ्र पांढरा
खपली उगा कां तू काढतेस…
नको दाखवू उगा गुलाब
श्वासानेही गळेल पाकळी
मोकळी होईल देठापासून
पस्तावाची येईल पाळी….
करते नजर जरी घायाळ
शपथ आहे मी *घेतली*
आली जवळ जरी कळी
कन्या मानून घरी सोडली….
होते जेव्हा वय तारूण्याचे
कळ्या जाळ्यात आल्या किती
तडफडल्या त्या मासोळी सम
नव्हती *वाल्यासम* वृत्ती…
जरी ठेवला हात कटिवर
रूप पाहिले माता रखुमाईचे
नाही ओढली वीट पायतळाची
धनी न झालो *पापाचे*…..
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157