You are currently viewing पुतण्या सचिनने उलगडले जयवंत दळवी..

पुतण्या सचिनने उलगडले जयवंत दळवी..

*पुतण्या सचिनने उलगडले जयवंत दळवी..”*

*कोकण मराठी साहित्य संमेलन -२०२५ मधील परिसंवाद रंगतदार*

सावंतवाडी:

शनिवार दिनांक २२ मार्च रोजी सावंतवाडीत कोकण मराठी साहित्य संमेलन २०२५ मोठ्या दिमाखात संपन्न झाले. यावेळी सिंधुदुर्गातील शिरोडा जवळ आरवली येथील प्रतिभासंपन्न ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार जयवंत दळवी या विषयावर चर्चात्मक असा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. खरंतर जयवंत दळवी या विषयावर प्रत्येक वक्त्याने सात आठ मिनिटांमध्ये बोलणे शक्यच नव्हते. कारण जयवंत दळवी हा विषय एवढा साधा सोपा नाही तर तो गहन आहे. त्यांच्यावर जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे.
यावेळी परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ लेखिका सौ. उषा परब होत्या आणि परिसंवादात सहभागी वक्ते होते ॲड.नकुल पार्सेकर, ॲड.तथा प्रा.अरुण पणदूरकर, जेष्ठ लेखिका सौ. वृंदा कांबळी आणि अर्थातच जयवंत दळवी यांचे उद्योजक असलेले पुतणे श्री सचिन दळवी. यावेळी ॲड.नकुल पार्सेकर यांनी त्यांना ज्ञात असलेले जयवंत दळवी उभे केले तर ॲड.अरुण पणदूरकर यांनी जयवंत दळवींनी आपल्या नाटकात, कादंबरीत रेखाटलेल्या विविध व्यक्तिमत्त्वांना जिवंत केले. ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांनी देखील वेळेचे भान राखून अगदी थोड्या वेळेत जयवंत दळवी यांचे विविध पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी यांनी आपल्या जया कांकाच्या या परिसंवादात इतर कुणालाही न समजलेली त्यांची दुसरी बाजू अतिशय खुमासदार शैलीत मांडली. जयवंत दळवी यांच्या सोबत सहवास लाभलेल्या इतर थोर साहित्यिकांचा देखील त्यात उल्लेख होता. जयवंत दळवी मासे खाण्याचे शौकीन परंतु तोलभाव करून ते कधीच मासे घेत नसायचे पण माश्यांना हात न लावता तो ताजा आहे की नाही ही कला त्यांना अवगत होती याबाबतही ते बोलले. जया काका माणूस म्हणून कसे होते याचे त्यांनी दर्शन घडवले.
जयवंत दळवी यांचा परिसंवाद उत्तरोत्तर रंगत गेला परंतु वेळेचे भान राखून औचित्यपूर्ण अशा निवेदनाने प्रा. रूपेश पाटील यांनी कार्यक्रमास चार चाँद लावले.

प्रतिक्रिया व्यक्त करा