प्रशासक सभेमध्ये 21 प्रस्तावांपैकी 18 प्रस्ताव मंजूर
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषदेची प्रशासक सभेमध्ये 17 प्रस्ताव विषय पत्रिकेवर ठेवण्यात आले होते. तसेच आयत्यावेळी 4 विषय संबंधित खातेप्रमुख यांनी मांडले, असे एकूण 21 प्रस्तावांपैकी 18 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मंजूर प्रस्तावांबाबत जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचाना प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबडुकर यांनी सूचना दिल्या आहेत.
जे प्रस्ताव मंजूर करण्यात आले नाहीत, त्यांच्याबाबतीत पर्यायी व्यवस्था कशी करता येईल याबाबत विचार विनिमय करण्यात आला व त्यापध्दतीने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही सर्व खातेप्रमुखांना दिल्या. या स
भेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक, सर्व खातेप्रमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
मंजूर प्रस्तावांमध्ये प्रामुख्याने समाजकल्याण जिल्हा परिषद 20 टक्के सेस योजनेंतर्गत प्राप्त प्रस्तावांच्य यादीला मान्यता देण्याबाबत. (शिलाई मशिन, घरघंटी, स्मशानशेड, समाज मंदीर दुरुस्ती.) समाजकल्याण जिल्हा परिषदे 5 टक्के सेस अनुदानातून दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल देणे योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषदेचे देखभाल दुरुस्ती उत्पन्नाचे सन 2024-25 अंतिम सुधारीत व 2025 -26 च्या मुळ अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबत, महिला व बालविकास विभागामार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षा राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद 10 टक्के सेस योजनांच्या पात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावास मान्यता देणे, या विषयांचा समावेश आहे.
शिक्षण (प्राथमिक) जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत आदर्श शाळामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे. (संगणक, प्रिंटर, टेबल-खर्ची,अग्निशामक यंत्र,) जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत आदर्श शाळामध्ये विज्ञान प्रयोग शाळा, संगणक प्रयोग शाळा, डिजिटल शाळा, इंटरनेट, वायफाय सुविधा निर्माण करणे या योजनेअंतर्गत. (संगणक, प्रिंटर, टेबल-खुर्ची, अग्निशामक यंत्र.) पंधरावा वित्त आयोग अंतर्गत काम बदल. इ. प्रस्तावाचा समावेश होता.
तसेच मार्च अखेर असल्याने योजनांचा 100 टक्के निधी खर्च करण्याबाबत सर्व खातेप्रमुख यांना सूचना देण्यात आल्या आहेत.