सावंतवाडीच्या मोती तलावात कोसळलेल्या विद्यार्थिनीला वाचवण्यात यश
दीपेश शिंदे यांनी तलावात उडी घेऊन वाचवले…
सावंतवाडी
येथील मोती तलावात महाविद्यालयीन विद्यार्थिनी कोसळली. ही घटना आज सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास राजवाड्यासमोर घडली. तिला सावंतवाडीतील कलाकार दीपेश शिंदे यांनी तलावात उडी घेऊन वाचवले.
भूमिका शेडगे असे तिचे नाव आहे. तिला वाचविण्यात यश आले असून तिला सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ती शिरोडा नाका परिसरातील एका कॉम्प्लेक्स मध्ये राहते. शहरात असलेल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात ती शिक्षण घेते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली.