श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर आणि ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा यांचे मनोमिलनाची अभूतपुर्व भेट संपन्न
देवगड कुणकेश्वर
आज दिनांक-२१/०३/२०२५ रोजी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दोन्ही देवस्थान ट्रस्ट वतीने एकमेकांचा मानसन्मान करण्यात आला. श्री देव रामेश्वर संस्थान-आचरा वतीने श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टला सन्मानचिन्ह देवून मनोमिलनाचा संदेश दिला व एकंदर महाशिवरात्री यात्रा दरम्यान कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ कुणकेश्वर यांसकडुन करण्यात आलेले स्वागत व एकंदर आदरातिथ्य बद्दल आभार व्यक्त केले. प्रत्येक देवस्थान वतीने देवसेवेतून सामाजिक कार्य आणि सामाजिक बांधिलकी सोबत धार्मिकता अधिक वृध्दींगत व्हावी या हेतूने सर्वांनी एकत्र होवून हिंदुसंस्कृती मधील दैविकता जपून पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक देवस्थान कमिटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. एकनाथ तेली यांनी केले. यावेळी दोन्ही देवस्थानचे विश्वस्त- मानकरी व सर्व देवसेवक उपस्थित होते.