You are currently viewing सॅनीटायझर वापरणाऱ्यांना धोक्याचा इशारा..

सॅनीटायझर वापरणाऱ्यांना धोक्याचा इशारा..

कोरोना साथी रोगांमुळे लोकांच्या दैनंदिन जगण्यात अनेक बदल झालेत. आधी लोक प्रदुषण आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी तोडाला रुमाल बांधायचे. मास्क तर केवळ रुग्णालयांमध्ये डॉक्टरच वापरताना दिसायचे. मात्र, कोरोनामुळे मास्क सर्वसामान्य नागरिकांच्याही आयुष्याचा भाग झालाय. याच प्रकारे सॅनिटायझर (Sanitizer) देखील मोठ्या प्रमाणात वापरलं जातंय. शहरापासून अगदी ग्रामीण भागापर्यंत लोक अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर (Alcohol) वापरत आहेत. असं असलं तरी कोरोनापासून वाचण्यासाठी सॅनिटायझर वापरणाऱ्यांना धोक्याचा इशारा आहे.

नुकताच जागतिक पातळीवर प्रकाशित झालेल्या एका अहवालात सॅनिटायझरच्या धोक्यांचा खुलासा करण्यात आलाय. यानुसार हे सॅनिटायझर तुमच्या मुलांना कायमचं अंधत्व देखील आणू शकतं. त्यामुळे मुलांसह संपूर्ण कुटुंबाने सॅनिटायझर वापरताना खूप काळजी घेण्याची गरज आहे.

फ्रांसमध्ये नुकताच यावर एक अहवाल प्रकाशित झालाय. यात 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये सॅनिटायझरमुळे अधिक प्रमाणात मुलं जखमी झाल्याचं समोर आलंय. यातील अनेकांचे डोळे खराब झालेत. त्यामुळेच संशोधकांनी सॅनिटायझर वापरताना काळजी घेण्यास सांगत ते डोळ्यात गेल्यावर अंधत्व येऊ शकतं असा इशारा दिलाय.

फ्रेंच पॉईझन कंट्रोल सेंटरच्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिला 2020 ते 24 ऑगस्ट 2020 च्या दरम्यान सॅनिटायझरमुळे दुखापत झालेल्यांची संख्या 232 होती. त्याचा विचार करता मागील वर्षी हाच आकडा 33 होता. कोरोनामुळे लोक मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर वापरत आहेत. यातील 70 टक्के सॅनिटायझर अल्कोहोलयुक्त आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा