वेंगुर्ले तालुक्यातील “हर घर जल” ग्रामपंचायतींचा सन्मान…
वेंगुर्ले
जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील “हर घर जल” झालेल्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन व गौरव करण्याकरीता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालय सभागृह येथे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.
वेंगुर्ला गटाकडील हर घर जल ऑनलाईन घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत रेडी- सरपंच रामसिंग राणे, आसोली- बाळा जाधव, मोचेमाड – प्रशासक, शिरोडा – लतीका रेडकर, परबवाडा- शमिका बांदेकर, पेंडुर- संतोष गावडे, म्हापण- आकांक्षा चव्हाण, परुळे- प्रणीती आंबडपालकर, कोचरा- योगेश तेली इत्यादी ९ ग्रामपंचायतींच्या २१ महसुली गावांच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना वितरीत करण्यात आले. यावेळी वेंगुर्ले पंचायत समिती गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, विस्तार अधिकारी (आरोग्य) सच्चीदानंद परब, ग्रामपंचायत पाणीपुरवठा अभियंता अनुप दळवी, बीआरसी अधिकारी द्रौपदी नाईक, कर्मचारी, सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी आदी उपस्थित होते.