वायंगणी कार्य क्षेत्रातील महसूल गाव तळेकर वाडी मधील ग्रामस्थांचे उपोषण आश्वासनाअंती तात्पुरत्या स्वरूपात स्थगित
सावंतवाडी
15 मे 2025 पर्यंत BSNL मनोरा चालू करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकंडून मिळाले आहे. त्यामुळे आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी करण्यात आलेले उपोषण 15 मे 2025 पर्यंत वायंगणी कार्य क्षेत्रातील महसूल गाव तळेकर वाडी मधील ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे.
तसेच 15 मे 2025 रोजी पर्यंत BSNL मानोरा कार्यान्वित न झाल्यास 16 मे 2025 रोजी पुन्हा हरिचरणगिरी तिठा येथील मनोऱ्यावर चढून बसून पुन्हा आंदोलन करण्यात येईल.
सर्व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले