You are currently viewing दौऱ्याच्या आडून जर मच्छीमार कुटुंबियांना विस्थापित करत असाल तर पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या दौऱ्याला प्रखर विरोध

दौऱ्याच्या आडून जर मच्छीमार कुटुंबियांना विस्थापित करत असाल तर पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या दौऱ्याला प्रखर विरोध

दौऱ्याच्या आडून जर मच्छीमार कुटुंबियांना विस्थापित करत असाल तर पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या दौऱ्याला प्रखर विरोध

मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांची भूमिका

मालवण

नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु हे मालवण दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे किनारपट्टीवरील मच्छीमार, मच्छी विक्रेते, व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक आणि व्यापारी स्वागतच करत आहोत. यामुळे मालवण किनारपट्टी देशाच्या नकाशावर झळकणार असल्याचा आनंद आहे. मात्र या दौऱ्याच्या आडून जर मच्छीमार कुटुंबियांना विस्थापित करण्याचे षडयंत्र प्रशासकीय यंत्रणांकडून रचले जात असेल तर आमचा या कार्यक्रमाला तीव्र विरोध असेल. प्रसंगी प्रखर आंदोलन छेडू असा इशारा किनारपट्टीवरील मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिक प्रतिनिधींनी आज येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.
महसूल विभागाकडून किनारपट्टीवरील बांधकामे सरसकटपणे बेकायदेशीररित्या हटविण्याच्या नोटीसा बजावल्याच्या निषेधार्थ आज दांडी येथील दांडेश्वर मंदिर परिसरात मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक, व्यापारी यांची महत्वपूर्ण बैठक झाली. महसूल प्रशासनाकडून सुमारे ९९ जणांची अनधिकृत बांधकामे असल्याची यादी बनविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी मच्छीमार नेते दिलीप घारे, बाबला पिंटो, रूपेश प्रभू, विली डिसोजा, शक्ती नागवेकर, नरेश हुले, मारूती हुले, संतोष शिरगावकर, सुमित ताम्हणकर, गोपीनाथ तांडेल, जॉन्सन डायस, विवेक पारकर, फारूक अहमद, सागर पाटकर, नेपा फर्नाडिस, दत्ता धुरी, उमेश हुले, हेमंत रामाडे, अण्णा कदम, जीवन तांडेल, राजु कोयलो, अॅलेक्स गुदीन, रवि पारकर, विवि फर्नांडिस, चिन्मय तांडेल, शकुंतला हुर्णेकर, रॉकी डिसोझा, ऑल्वीन फर्नांडिस, योगेश काळसेकर, फॅन्की डिसोझा, विशाल जुवाटकर, कमलेश कोचरेकर, निकीता केळुसकर, महेश हुर्णेकर, प्रमोद खवणेकर, भूषण तोडणकर, चंद्रकांत प्रभू आदी उपस्थित होते.

पंतप्रधान मालवणमध्ये येत असल्याने अनेक सोयीसुविधा निर्माण होण्याच्या शक्यतेमध्ये आम्ही होतो, मात्र सोयीसुविधा निर्माण होण्याचे राहिले बाजूलाच उलट स्थानिकांना विस्थापित करण्याचे षडयंत्र प्रशासकीय यंत्रणांकडून आखले जात आहे. पंतप्रधानांचा दौऱ्याबाबत कोणतीही अधिकृतपणे माहिती देण्यात येत नसतानाही किनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या रोजीरोटीच्या झोपड्या तोडण्याचे काम केले जात असेल तर आम्ही साम, दाम, भेद, दंड याचा वापर करून लढा उभा करू. आजपर्यंत आम्ही प्रशासनाला सहकार्य केले आहे. आता अचानकपणे प्रशासनाकडून थेट आपला व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचे काम केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आमचा विरोध थेट पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहणार आहोत. आम्ही सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याच्या भुमीकेत असतानाही प्रशासनाकडून जबरदस्तीने आमचे व्यवसाय हटविण्याचा प्रयत्न कशासाठी केला जात आहे? असा प्रश्न यावेळी मच्छीमार प्रतिनिधींनी उपस्थित केला.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला असताना आजपर्यंत केंद्र व राज्य शासनाने कोणत्या सुविधा पर्यटन व्यवसाय वाढीसाठी दिल्या त्या जाहीर कराव्यात? स्थानिक भुमीपुत्रांनी बँकांची कर्जे काढून आपला रोजगार आपणच उभा केला आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचे सोडून त्यांचा रोजगार हिरावून घेण्याचा शासन पवित्रा कशासाठी आहे? पंतप्रधान देशातील तरूणांना रोजगार देण्याचे ध्येय ठेवत असताना युवकांनी उभा केलेला रोजगार तोडण्यासाठी शासन प्रयत्नशिल का आहे? पर्यटन व्यवसाय, मच्छीमार व्यवसाय उभा करण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे. यामुळे एका नोटीसीद्वारे हा व्यवसाय आम्ही कदापी उद्ध्वस्त होवू देणार नाही. पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व नियमांमध्ये आम्ही व्यवसाय करत आहोत, यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्याही घेण्यात आल्या आहेत आणि यासाठी सर्व शुल्कही भरलेले असताना कोणत्याही प्रकारच्या सुविधा शासन देत नाही, असाही आरोप यावेळी करण्यात आला. यासाठी तीव्रपणे लढा उभा केला जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मच्छीमारांचा विरोध स्पष्ट केला जाईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

येथील किनारपट्टीवर मरीनपार्क उभारून स्थानिकांना विस्थापित करण्याचे काम शासन यंत्रणेकडून करण्यात आले होते. त्यावेळी मच्छीमारांनी तीव्र विरोध केल्यानंतर शासनाने मरीनपार्क प्रकल्प गुंडाळला होता. आता तोच प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असल्याचा संशय या कारवाईच्या निमित्ताने येत आहे.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा