*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
एकनाथ षष्ठी निमित्त श्री नाथांना वंदन!
*”एकनाथांची सांगी”*
एकनाथ सांगती हरिनामे जाऊ तरुन
आत्मदेव ओळखावा काळ जाई क्षणक्षण!!धृ!!
कोण मी कोठून जन्मां आलो पुण्य घेऊन
माते उदरी वाढलो देह सौष्ठव ईश देन
मनुष्य जन्म एकदाच राहावे ईश कृतज्ञ!!1!!
बालपण खेळण्यांत तारुण्य जाई कामांत
नरदेहांत देव आहे घ्यावे समजून
देह हातून जाण्या आधी जावे गुरूंना शरण!!2!!
दोन जीवांचे होते मिलन पूर्वसुकृतानं
अहंकारे कलह होतो काहीही निमित्तानं
अहं टाळावा सुखी होईल संसार जीवन!!3!!
वासनां मनाकडून घडवते वर्तन
आंधळे असते ज्ञान सुप्तावस्थेत राहिल्यानं
जावे गुरुंसी शरण करिती मार्गदर्शन!!4!!
बाह्य कानांची नसते गरज होण्या आत्मज्ञान
पांगळे मन धावते स्वैर जलद गतीनं
एक चित्ताने घ्यावे नाम मिळे गुह्य ज्ञान!!5!!
उद्यानी गाते कोकीळ बोलविता धनी कोण
सुमनाचे दिवसाचे जीवन देते आनंद
हरिनाम तारिल त्यागे आचरावे जीवन!!6!!
श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201Cell.9373811677.