You are currently viewing कुडासे हायस्कूल दहावीचा निकाल 100%

कुडासे हायस्कूल दहावीचा निकाल 100%

दोडामार्ग

मार्च/एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा निकाला मध्ये सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज सायन्स,कुडासे प्रशालेचा निकाल १००% लागला, विशेष बाब म्हणेज २६ विद्यार्थापैकी २३ विद्यार्थ्यांना क्रीडागुण तर ३ विद्यार्थ्याना कलेचे गुण मिळाले. यात उच्चतम श्रेणी २१,प्रथम श्रेणी ५ विद्यार्थी पास झाले. आदित्य जालिंदर शेंडगे ९६.८०% प्रथम क्रमांक, व्दितिय क्रमांक* अपूर्वा प्रविण घाडी ९४.६०% तर तृतिय क्रमांक (विभागून) नारायण संदेश चारी ९४.४० % व आदिती लक्ष्मण देसाई ९४.४०% असे प्रशालेतून पहिले तीन क्रमांकाने विद्यार्थी पास झाले.

धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. सिमा तोरसकर, कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर, सचिवा श्रीम. कल्पना तोरसकर, प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, समन्वय समिती सचिव श्री.लक्ष्मण पावसकर,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री. पी. बी. बस्तवाड, श्री. एस. व्ही. देसाई, शालेय समिती सदस्य सतिश मोरजकर, प्रकाश कुडास्कर, मंगेश गवस, प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थाचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा