You are currently viewing प्रा. मिलिंद भोसले व ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यंदाचे पुरस्कार जाहीर.

प्रा. मिलिंद भोसले व ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यंदाचे पुरस्कार जाहीर.

प्रा. मिलिंद भोसले व ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यंदाचे पुरस्कार जाहीर.

अच्युत सावंत-भोसले व प्राचार्य यशोधन गवस ठरले यंदाचे पुरस्कारार्थी

सावंतवाडी

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा स्वर्गीय प्रा. मिलिंद भोसले व स्वर्गीय ॲड. दीपक नेवगी स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारे या वर्षीचे पुरस्कार यशवंतराव भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष श्री अच्युत सावंत-भोसले व देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांना जाहीर करण्यात आले. यंदा पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे.

सावंतवाडीत कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन 22 मार्च रोजी होत आहे. या संमेलनात हे दोन्ही पुरस्कार वितरण केले जाणार आहेत. पुरस्कारासाठी दरवर्षी निवड समिती नेमण्यात येते. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. यंदाच्या वर्षी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या भोसले नॉलेज सिटीचे सर्वेसर्वा अच्युत सावंत भोसले व प्राचार्य यशोधन गवस या दोघांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी दिली. यावेळी शाखेच्या कार्यकारिणी व निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हा साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक सावंतवाडी येथे घेण्यात आली. यावेळी आज सायंकाळी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला शाखेतर्फे हे दोन्ही पुरस्कार निवड समितीच्या एकमताने निश्चित करण्यात आले व त्याची घोषणा आज गुरुवारी करण्यात आली. शनिवारी 22 मार्चला सावंतवाडी बॅरिस्टर नाथ. पै. सभागृहात जिल्हास्तरीय साहित्य संमेलन सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार आहे. या कालावधीत सदर पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, असे निवड समितीने स्पष्ट केले.

यावेळी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, खजिनदार भरत गावडे, तालुका सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, प्रज्ञा मातोंडकर, मेघना राऊळ, ऋतुजा सावंतभोसले, सौ, मिलन पालव आदि उपस्थित होते. 14 व 15 मार्च या दोन दिवशी प्राध्यापक मिलिंद भोसले व ॲड. दीपक नेवगी यांचा स्मृतिदिन शाखेतर्फे साजरा करण्यात येतो. हे दोन्हीही व्यक्ती कोकण मराठी साहित्य परिषदेचे मार्गदर्शक सदस्य होते. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्राध्यापक मिलिंद भोसले व अॅड. दीपक नेवगी यांचे कुटुंबीय यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा