You are currently viewing 23 आणि 24 मार्च रोजी साहित्य आणि सांस्कृतिक मेजवानी

23 आणि 24 मार्च रोजी साहित्य आणि सांस्कृतिक मेजवानी

23 आणि 24 मार्च रोजी साहित्य आणि सांस्कृतिक मेजवानी

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन

·      पालकमंत्री नितेश राणे यांचे हस्ते होणार उद्घाटन

·      छत्रपती शिवाजी महाराजांवर विशेष व्याख्यान

सिंधुदुर्गनगरी

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सव भरविण्यात येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय संचालनालय, मुंबई  आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव -2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव रविवार दि.23 आणि 24 मार्च 2025 रोजी  पत्रकार भवन ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवाचे  उद्घाटन मत्स्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते  रविवार दि. 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.

यावेळी लोकसभा सदस्य नारायण राणे, आमदार सर्वश्री ॲड निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दिपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुबंई चे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी, मुबंई विभागाचे प्र. सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, कोकण मराठी साहित्य परीषदेचे अध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह राजन पांचाळ आदी उपस्थित राहणार असून या ग्रंथोत्सवाला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी  केले आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा-

दि. 23 मार्च 2024 रोजी  सकाळी 8.30 वाजता ‘ग्रंथ पुजन व ग्रंथादिंडी शुभारंभ’  प्रमुख उपस्थिती- ओरोस ग्रामपंचायतीच्या सरपंच आशा मुरमुरे, उपसरपंच पांडूरंग मालवणकर

(स्थळ-   छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ओरोस फाटा ते पत्रकार भवन ओरोस –सिंधुदुर्गनगरी पर्यंत)

सकाळी 10:00 वाजता : उद्घाटन समारंभ – उद्घाटक- पालकमंत्री नितेश राणे,  विशेष अतिथी – नारायण राणे,  खासदार, प्रमुख अतिथी – आमदार सर्वश्री ॲड निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दिपक केसरकर, निलेश राणे

दुपारी 12 वाजता :  व्याख्यान-  ‘मला भावलेले  छत्रपती शिवाजी महाराज’ व्याख्याते-  श्री. प्रदिप ढवळ,  नाटककार व कांदबरीकार.

दुपारी 2 वाजता :’शतायु चिरंतन जयवंत दळवी’  सहभाग-  वृंदा कांबळी, विनय सौदागर, सचिन दळवी, सोनाली गोडे

दुपारी 3 वाजता: ‘कलारंजन’  सादरकर्ते-  सार्वजनिक ग्रंथालय, सिंधुदुर्ग पदाधिकारी व कर्मचारी.

ग्रंथोत्सवाचा दुसरा दिवस दि. 24 मार्च 2025-

सकाळी 11 वाजता: ‘बालवाचक व वाचनसंस्कृती’ , मला आवडलेले पुस्तक, कथाकथनाचा कार्यक्रम.

दुपारी 12.30 वाजता: परिसंवाद-  ‘भविष्यातील सिंधुदुर्ग आणि माध्यमांची भुमिका’ संवादक- मुकुंद चिलवंत, जिल्हा माहिती अधिकारी सहभाग-  सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, दै. तरुण भारत संपादक शेखर सामंत, दै. पुढारी आवृती प्रमुख गणेश जेठे, दै. लोकमत चे आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक, दै.सकाळ चे आवृत्ती प्रमुख शिवप्रसाद देसाई, दै. प्रहारचे आवृत्ती प्रमुख संतोष वायंगणकर,दै. रत्नागिरी टाइम्स चे आवृत्ती प्रमुख लक्ष्मीकांत भावे,  दै. कोकणसाद चे संपादक संदीप देसाई , वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल रेवडेकर उपस्थित राहणार आहेत.

दुपारी 2.30 वाजता: ‘काव्यरंग:निमंत्रितांचे काव्यसंमेलन’

दुपारी 3.30 वाजता : ‘माझी माय मराठी अभिजात भाषा’ व्याख्याते-  भरत गावडे, सदस्य, महराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ,  विठ्ठल कदम, सदस्य- महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे.

दुपारी 4 वाजता: समारोप कार्यक्रम प्रमुख अतिथी-  पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, साहित्यिक, मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी, नितिन राऊत, उपजिल्हाधिकारी, रोहयो, मंगेश मसके, अध्यक्ष,  सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ , आदी उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा