*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात “फ्रंटीयर इन केमिकल सायन्सेस” या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन*
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व इंटरनल क्वालिटी अशुरन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि.२२ मार्च २०२५ रोजी एक दिवसीय “फ्रंटीयर इन केमिकल सायन्सेस” या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ मा. डॉ. प्रकाश वडगावकर, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे यांच्या हस्ते होणार असून या कार्यशाळेमध्ये रसायनशास्त्र विषयासंबंधी विविध विषयांवर रसायनशास्त्र तज्ञ डॉ. एस. डी.डेळेकर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. एच. व्ही. चव्हाण, ए.एस.पी. महाविद्यालय, देवरुख व डॉ. पी. एस. भाले, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर यांचे मार्गदर्शन होणार आहे. सदर राष्ट्रीय परिषदेला महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री. विजय रावराणे, सहसचिव स
श्री.सत्यवान रावराणे, विश्वस्थ श्री. शरदचंद्र रावराणे, महाविद्यालयाच्या स्थानिक समितेचे अध्यक्ष स
श्री. सज्जनकाका रावराणे व सचिव श्री. प्रमोद रावराणे उपस्थितीत राहणार आहेत. या परिषदेमध्ये भारतातील विविध नामांकित विद्यापीठे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व केमिकल इंडस्ट्री मधील तज्ञ अश्या एकूण ३०० हून अधिक सभासदांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. या परिषदेमध्ये पोस्टर व ओरल प्रेसेंटेशनच्या माध्यमातून रसायनशास्त्रातील विविध संशोधन विषयांवर चर्चा होऊन याचा फायदा नवसंशोधक व विद्यार्थी यांना होणार आहे. या परिषदेमध्ये जास्तीत जास्त संशोधकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, समन्वयक डॉ. डी. एम. सिरसट व सचिव के. एस. पाखरे यांनी केले आहे.