मालवणात २१ मार्चला मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन…
मालवण
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर २१ मार्चला दुपारी ३ ते सायं. ६ या वेळेत मालवण-फोवकांडा पिंपळ सुमतीछाया मेडिकल येथे होणार आहे.
यात पोटदुखी व पोटाचे विकार, अपचन व पित्ताचा त्रास, मूळव्याध व फिस्टूलाच्या आजारावर लेजरद्वारे उपचार, शुगरमुळे झालेल्या जखमांवर ‘व्हॅक्युम ड्रेसिंग’ सारख्या नव्या उपचार पद्धती, मुत्राशयाचे व अंडकोशाचे आजार, बद्धकोष्ठतेचा आजार, सर्व प्रकारचे हर्निया या आजारांची मोफत तपासणी होणार आहे. यावेळी कुडाळ येथील डॉ. अनिकेत वजराठकर हे सर्जन उपस्थित राहणार आहेत. तरीही या शिबिराचा जास्तीत-जास्त रूण्नांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२०२०६९०१ या नंबरवर संपर्क साधावा.